“बॉलिवूडवाले मुंबईसारखी स्वप्ननगरी सोडून यूपीत जाऊन काय डाकू बनणार का?”

0
274

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशी फिल्मसिटी उभारण्याचा संकल्प केला होता. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबई ही स्वप्ननगरी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. मग कलाकार उत्तर प्रदेशात जाऊन काय डाकू बनणार आहेत का? असं म्हणत गुलाबराव पाटलांनी योगींना टोला लगावला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सुरक्षितता आहे का? उत्तरप्रदेशात दिवसाढवळ्या बँकेत दरोडे पडतात. मग तिथं गुंतवणूक करणं कितपत योग्य आहे? त्यामुळे बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार का, याबाबत माझ्या मनात साशंकता आहे, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बॉलिवूड मुंबईबाहेर नेणं हे खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का?- योगी आदित्यनाथ

“तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय”

हार्दिक पांड्या-रविंद्र जडेजाची फटकेबाजी; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचे लक्ष्य

“बॉलिवूड अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here