मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यातील तसेच देशभरातील महत्वाचे नेते मंचावर उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर दोन तासांच्या आतच देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमातील धोरणांवर टीका केली आहे.
महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!, असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे.
नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019
शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!, असंही ते म्हणाले.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो.
त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! @OfficeofUT @uddhavthackeray— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019
दरम्यान, पथविधी झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे शपथविधी झाल्यावर तात्काळ निघून गेले.