मुंबई | बरोबर सायंकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे 29 वे तर शिवसेनेचे 3 रे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकूण सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
उद्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तर काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात आणि विदर्भातले काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी यांनी शपथ घेतली.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे उपस्थितांसमोर नतमस्तक झाले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा मोठा कडकडाट केला