Home मनोरंजन श्यामची आई चित्रपटातील ‘श्याम’ हरपला ; अभिनेते माधव वझे यांचं निधन

श्यामची आई चित्रपटातील ‘श्याम’ हरपला ; अभिनेते माधव वझे यांचं निधन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ज्येष्ठ अभिनेते, समीक्षक, प्राध्यापक माधव वझे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे, ते ८६ वर्षांचे होते. १९५३ सालच्या श्यामची आई चित्रपटातून माधव वझे यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांच्या या भूमिकेचे खूप मोठे कौतुक झाले होते.

माधव  वझे यांनी बालकलाकार म्हणून काही मोजके चित्रपट केले. बापजन्म, 3 इडिअट्स, डिअर जिंदगी, एवढंस आभाळ अशा हिंदी, मराठी चित्रपटात ते झळकले. हॅम्लेट या नाटकाचे  दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.

पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले होते. प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी , नंदनवन अशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

रणजित बोत्रे यांची सीना स्टार जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय

‘दहशतवाद्यांशी एकटा भिडला, बंदूक हिसकावली अन्…’, कोण आहे? हल्ल्यात मारला गेलेला सय्यद हुसैन शाह

…म्हणून मी वाचलो; कुटुंबासोबत पहलगाममध्ये गेलेल्या प्राध्यापकाने सांगितला थरारक अनुभव