आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : पुण्यातील गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत नुकताच विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रशालेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता क्रीडा महोत्सव अंतर्गत विविध वैयक्तिक आणि सांघिक मैदानी खेळ घेतले होते. त्या विविध स्पर्धात विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गुणगौरव समारंभात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तत्पूर्वी या विद्यार्थी गुणगौरव समारंभास समाधान काटे, लक्ष्मण जाधव, ज्ञानेश्वर मोरे, फुलोरा फाऊंडेशनच्या प्रीती शिरोडे, अमृता म्हेत्रे, संजीवनी गाढवे आदी मान्यवर पाहुणे म्हणून लाभले होते. सदर प्रशाला विद्यार्थ्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. असेच उपक्रम यापुढेही राबवावेत असे प्रतिपादन समाधान काटे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे नियोजन रणजित बोत्रे आणि विशाल चव्हाण यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका जयश्री कासार, गीतांजली कांबळे आणि मंदाकिनी बलकवडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गावडे यांनी केले. टिव्ही 9 मराठीच्या रिपोर्टर पदी नियुक्ती झाल्याबद्दल लक्ष्मण जाधव यांचा विशेष सत्कार प्रशालेच्या वतीने यावेळी करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
गोपाळकृष्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी उभारली संकल्पांची गुढी
जिल्हास्तरीय नृत्याविष्कार स्पर्धेला शाळांचा उस्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांकडून अप्रतिम सादरीकरण
MVM सेमी इंग्लिश शाळेत बोरन्हाण संपन्न, काळे कपडे घालून विद्यार्थ्यांचा उत्साह
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; 12 लाखांपर्यंत उत्पन्न आयकरमुक्त