आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपाने जाहीर केलेल्या यादीमध्ये पक्षाकडून आधीच्याच सर्व आमदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचं दिसून येत आहे. तर दोन विद्यमान आमदारांना धक्का दिलाय.
ही बातमी पण वाचा : शरद पवार गटाचे उमेदवार ठरले! संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर; पाहा संपूर्ण यादी
कामठी मतदारसंघामध्ये भाजपचे टेकचंद सावरकर हे आमदार होते. मात्र यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे, आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदार संघातून अश्विनी जगताप यांचं तिकीट कापण्यात आलं असून शकंर जगताप यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर या पहिल्या यादीत पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना आणि पर्वती विधानसभा मतदारसंघांमधून माधुरी मिसाळ या तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“महाविकास आघाडीने CM पदाचा उमेदवार ठरवण्याऐवजी विरोधी पक्षनेता ठरवावा”
निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल; प्रकृतीबदल महत्त्वाची अपडेट समोर
“ब्रेकींग न्यूज ! बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या”