Home महाराष्ट्र आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत…; राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना

आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत…; राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बदलापुरात साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट करत पोलिसांना सवाल केला आहे.

बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले?, असा सवाल करत एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत…; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, अशी सूचना राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपला मोठा धक्का? ‘हा’ मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

“सांगलीच्या बिसूर हायस्कूल, बिसूरमध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ध्वजारोहण संपन्न”

खडकवासला मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचा दावा