Home महत्वाच्या बातम्या अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं सूचक वक्तव्य

अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं सूचक वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता अतुल बेनके हे अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का?, अशा चर्चा सुरू आहेत. यावर अतुल बेनके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : भारताची विजयी सलामी; पाकिस्तानवर 7 विकेट्सने शानदार विजय

राजकारणात काहीही घडू शकतं, अगदी शरद पवार आणि अजित पवार ही एकत्र येऊ शकतात, असं आमदार अतुल बेनके म्हणाले आहेत.त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात काहीही चर्चा झालेली नाही. लोक भेटायला येत असतात. अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. यामध्ये काही राजकारण होत असेल तर त्यावेळेला त्याचा निकाल देऊ, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपच्या मोठ्या नेत्याचं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; वातावरण तापलं

शिंदे, फडणवीस, पवार नाही तर राज्यातील मतदारांची भाजपच्या ‘या’ नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती!

शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…