Home महाराष्ट्र शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही समाज एकमेकांच्या समोर उभा ठाकला जाताना दिसतोय. त्यामुळे वातावरण शांत व्हावं या उद्देशाने आपण शरद पवारांची भेट घेतली आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजी राजे आक्रमक

“राज्यात कटुता वाढत आहे. ती शांत राहिली पाहिजे. पटविण्याला अक्कल लागते, पेटवायला नाही. जुळवायला अक्कल लागते, जाळायला नाही. सर्वांनी एकत्र येवून शांतता राखली पाहिजे. राज्य शांत राहिले पाहिजे, त्यासाठी मी पुढाकार घेतला. मी आजही राजीनामा द्यायला तयार आहे. कोणताही राजीनामा मागितला तरी मी द्यायला तयार आहे. राज्यात डोके फुटता कामा नये, यासाठी सर्वजण पुढे येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार सगळे पुढे येत आहेत. भविष्यात राज्य निश्चितपणे शांत होईल”, असही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मोठी बातमी! शिंदे गटाच्या ‘या’ महिला नेत्यांना गांजा तस्करीत अटक

 मोठी बातमी! मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या राजकीय हालचाली; एकनाथ शिंदे 47 आमदारांना भेटणार