आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून महायुतीच्या नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमदेवारांचा विजय झाला. या निकलावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज महायुतीसाठी आनंदाची गोष्ट आहे. आमचे नऊ उमेदवार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा नऊ जागा लढवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेक जण वल्गना करत होते. आमचे उमेदवार पडतील, अशा प्रकारे सांगितले जात होतं. मात्र, आज आम्हाला आमची मते मिळाली, पण महाविकास आघाडीची मतेदेखील आम्हाला मिळाली आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! शिंदे गटाच्या ‘या’ महिला नेत्यांना गांजा तस्करीत अटक
दरम्यान, या निवडणुकीत आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यादेखील विजय झाल्या आहेत. आमचे निवडून आलेले नऊ उमेदवार बघितले, तर सर्व उमेदवार हे सर्वसाधारण कुटुंबातील आणि जनतेसाठी काम करणारे आहेत. या निवडणुकीत निवडून आलेल्या महायुतीच्या सर्व नऊ उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या राजकीय हालचाली; एकनाथ शिंदे 47 आमदारांना भेटणार
“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचे माजी डॅशिंग नगरसेवक वसंत मोरेंनी केला शिवसेनेत प्रवेश”
दुःखद! ‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार’ चित्रपटाचे निर्माते जॉन लँडो यांनी घेतला जगाचा निरोप