आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठवाड्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील तीन मोठ्या नेत्यांची आज बंद दाराआड गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.
हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील यांच्यात ही बैठक पार पडली आहे. ही बैठक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ही बातमी पण वाचा : वटसावित्री पुजेला जाताना महिलांनी…; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
दरम्या, या गुप्त बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या नेत्यांना बैठक झाल्याचं मान्य करावं लागलं आहे. पण या भेटीत नेमकी काय राजकीय खेळी असणार?; याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
काँग्रेसला मोठे खिंडार; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
राज्यात पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच; ‘या’ काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य