आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
आज संध्याकाळी 7. 15 मिनिटांनी एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आता या सोहळ्याला अवघे काही तास उरलेले असताना राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला असून कुणाला कोणतं खातं मिळणार याची देशभर चर्चा होते आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कोण कोणते खासदार असतील याची यादी समोर आली आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात आज 40 ते 45 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी पीएमओ कार्यलयातून फोनाफोनी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन आला आहे. आतापर्यंत 32 जणांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव यांनाही फोन आला आहे. नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांचीही वर्णी लागली आहे.
ही बातमी पण वाचा : शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात; ‘या’ काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट
दरम्यान, महत्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवणार आहे, अशी माहिती आहे. गृह, वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत.
महाराष्ट्रातून मोदी मंत्रिमंडळात कोण असेल?
– नितीन गडकरी, भाजप, विदर्भ
– पियुष गोयल, भाजप, मुंबई
– मुरलीधर मोहोळ, भाजप, पश्चिम महाराष्ट्र
– रक्षा खडसे, भाजप, उत्तर महाराष्ट्र
– प्रतापराव जाधव, शिवसेना, विदर्भ
– रामदास आठवले, आरपीआय
महत्त्वाच्या बातम्या –
शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात; ‘या’ काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट
मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका नेत्याने दिला राजीनामा
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?