आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे.
पनवेलमध्ये भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी आणि मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी यावेळी सिडकोकडून वसूल केल्या जाणाऱ्या मालमत्ता करावर भूमिका मांडली.
ही बातमी पण वाचा : “…नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लोकसभा लढतील”
निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने मावळे येत आहेत. संख्या वाढत आहे. या सर्वांचं स्वागत आहे. ही टीम आली. ती पनवेलमधील आहे. संजोग वाघेरे यांच्या मावळ मतदारसंघातील आहे. यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे जाहीर करतात. अशक्यप्राय गोष्टी आम्ही करू सांगत असतात. ते सांगतात मूळचे प्रश्न दूर राहतात. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत, त्या त्यांच्या एकट्याच्या नाहीत. तिथले जे काही प्रश्न आहेत. त्यावर आंदोलन झाले आहेत. अजूनही सुरू आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; मात्र ‘या’ भाजप नेत्याचा विरोध
मोठी बातमी! राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा”