आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : सांगलीच्या जागेवरून अनेक दिवसांपसून राजकीय नाटय सुरू होतं. मात्र सांगली लोकसभा मतदारसंघ उध्दव ठाकरे गटाला मिळाला. त्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेसने बंडखोरी केल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने विशाल पाटील यांच्यासाठी आज उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालतील निवडणूक कार्यालयातून घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील हे बंडखोरीच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; मात्र ‘या’ भाजप नेत्याचा विरोध
काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील विशाल पाटील अद्याप ठाम आहेत. काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत. त्याबाबत सध्या सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कॉग्रेस कार्यकर्ता आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठका सूरु आहेत.
दरम्यान, येत्या देन दिवसात काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार त्यानंतर विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून वसंतदादा आघाडी नावाने ही आघाडी स्थापन करणार आहेत, असं विशाल पाटील यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येत आहे. येत्या १६ तारखेला विशाल पाटील हे भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शनही करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा”
सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; सांगलीची जागा मिळाली ‘या’ पक्षाला