आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असून ठाकरे गटाने या जागेवर उमेदवार दिला आहे. आणि प्रचारही सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे.
सांगलीची जागा आमची होती, आहे आणि राहीन. सांगलीची जागा काँग्रेसची आहे, हे जनावरांना सुद्धा माहीत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी दिली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
ही बातमी पण वाचा : भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराचा ठाकरे गटात प्रवेश
सांगली जिल्ह्यातील लोकांचे म्हणणं आहे की, सांगलीची जागा परंपरेनं काँग्रेसची आहे. आमचं मजबुत संघटन आहे. ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहोत. संजय राऊत काय बोलतात, यावर प्रतिक्रिया देण्याची आवशकता नाही, असंही विश्वजित कदम म्हणाले आहेत.
दरम्यान, सांगलीत दोनदा भाजपचा उमेदवार निवडून आलाय. त्यामुळेच बदल घडावा म्हणून विशाल पाटील यांच्या रुपाने आम्ही सक्षम उमेदवार दिला आहे. आम्हाला कुणीही इशारा देऊ नये ( उबाठा) काँग्रेस महाराष्ट्रात मजबूत पक्ष आहे. सांगलीच्या घराघरात काँग्रेसची विचारधारा गेलीय. त्यामुळे इतर कुणी सांगलीबाबत वक्तव्य करू नये, असा इशाराही विश्वजित कदम यांनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
पुण्याच्या राजकारणामध्ये ट्वीस्ट ; वसंत मोरेंना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर
बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला नमवत दिल्ली कॅपिटल्सने नोंदवला पहिला विजय
भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर टीका,म्हणाले…