आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाला बसले आहेत. याचदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात सभा होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी त्यांना जागेवरुन हलवून दाखव, असं आव्हानच नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. राणेंनी ट्विट केलं आहे.
ही बातमी पण वाचा : राज ठाकरे देणार एकनाथ शिंदेंना धक्का? शिवसेनेतील ‘हा’ मोठा नेता मनसेच्या वाटेवर
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असं राणे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय…
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 14, 2024
महत्त्वाच्या घडामोडी –
लोकं येत असतात जात असतात, एका व्यक्तीच्या जाण्याने पक्ष कोसळत नाही – विजय वडेट्टीवार
…म्हणून मी राजीनामा दिला; राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण
“अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले…”