कोल्हापूर : महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे. त्यामध्ये प्राणी आहेत. फक्त विदुषक नाही, असं म्हणत शरद पवार यांनी महाराष्ट्रात सर्कस सुरू असल्याचं मान्य केलं आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या 60 व्या वाढदिवसाच्यानिमित्त कोल्हापूर शहरामध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आरोग्यविषयक साहित्याचे विविध ठिकाणी वाटप केले. राजारामपुरी येथील कार्यक्रम संपल्यानंतर पाटील यांनी शरद पवारांनी केलेल्या विधानावरून महाविकास आघाडी सरकारवर आणि शरद पवारांवर निशाणा साधला.
दरम्यान, माझ्या या विधानानंतर जितेंद्र आव्हाड हे चंद्रकांतदादांना पवारांविषयी आदर नाही, असे विधान करण्यासाठी पुढे येतील. गेली 5 वर्षे मी पवार यांच्या संपर्कात आहे. त्यांचे साखर, शेतीविषयीचे ज्ञान त्याची मला कल्पना आहे. मात्र राजकारणात एखाद्याने एक चेंडू टोलवला की दुसऱ्यालाही तो टोलावणे भाग पडते. पण यातून दीर्घकाळ शत्रुत्व राहत नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अनेक जण टीका करत आहेत, पण…; जितेंद्र जोशीने केलं मुख्यमंत्र्यांच कौतुक
“विराटच्या ‘त्या’ कृत्याचा प्रत्येक भारतीयाला वाटला होता अभिमान”
“पोलिसांसाठी आनंदाची बातमी; ४८ तासांत एकाही पोलिसाला कोरोनाची लागण नाही”