आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.
मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाने तसंच समता परिषदेने कधीही विरोध केलेला नाही. पण आम्ही पहिल्यापासून हे निश्चितपणे म्हणालो आहोत की मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : कोकणात शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा धक्का; महाडचा गड शिंदेंनी राखला
वेगळं आरक्षण त्यांना द्या, सर्वोच्च न्यायालयात ज्या त्रुटी असतील त्या दूर करा आणि मराठा बांधवाना आरक्षण द्या. ओबीसीमध्ये अतिशय लहान लहान जाती आहेत. धनगर, वंजारी, कुणबी, माळी, तेली, सुतार, लोहार, कुंभार असे अनेक लोक त्यात आहे. त्यामुळे ओबीसींमधून आरक्षण दिलं तर कुणाचाच फायदा होणार नाही, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! परळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना मोठा धक्का
मोठी बातमी! भाजप खासदाराच्या गाडीचा गडचिरोलीत भीषण अपघात