आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरातील वातावरण पुन्हा तापत आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेअसून मराठा समाजाकडून सातत्याने मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत.
राज्य सरकार पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात क्यूरेटीव्ह पिटिशन दाखल करणार आहे. मुंबईत आज मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
ही बातमी पण वाचा : “राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर, आता मनसैनिक आक्रमक, आणखी एक टोलनाका फोडला”
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एस ईबीसीचं आरक्षण रद्द झाल्यानंतर ईडब्लुएसमधून नियुक्त्या मिळाल्या नाहीत. त्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली. याबाबत आजच्या बैठकीत राज्य सरकारने माहिती दिली. राज्य सरकार पुढील आठवड्यात पिटिशन दाखल करणार आहे.
दरम्यान, भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाला मंजुरी मिळाली होती. पण ते आरक्षण सुप्रीम कोर्टात फार काळ टिकलं नाही. कारण या आरक्षणाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आरक्षणाच्या बाबतीत 50 टक्क्यांची अट आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे संबंधित प्रकरण रखडलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
निवडणूक आयोगाची शरद पवार-अजित पवार गटाला नोटीस; राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं?
अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेवरून, अमोल मिटकरींचा, राज ठाकरेंना टोला, म्हणाले…
“पक्षफुटीवर, जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, अजित पवार आमच्याच पक्षात, मात्र…”