आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत असल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं असून त्याची चर्चा सुरू झाली आहे.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?; मनसेच्या या नेत्याचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव
पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे, असा सवाल नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर नाना यांनी,स्वागत आहे., असं म्हटलं.
दरम्यान, पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर स्वागत आहे. सोनिया गांधींशी त्यांची चर्चा झाली असेल तर चांगली गोष्ट आहे, असं नाना पटोले म्हणाले. पटोलेंच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीच्या फुटीवर अखेर शरद पवारांकडून शिक्कामोर्तब, म्हणाले…
“मोठी बातमी! सकाळी शरद पवारांच्या बैठकीला हजर राहणाऱ्याने ‘या’ आमदाराने दिला, अजित पवारांना पाठिंबा”
“अजित पवारांच्या शपथविधीच्या दिवशी नेमकं काय घडलं?; ‘या’ आमदाराने सांगितला सविस्तर घटनाक्रम”