आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : मला मंत्रीपदासाठी विचारणा करण्यात आली होती. परंतु एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असतील तर त्या मंत्रिमंडळात मला मंत्री किंवा राज्यमंत्री पदही नको, अशी स्पष्ट भूमिका शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी घेतली.
अजित पवार हे नेते असल्याने त्यांनी मला संपर्क साधल्यानंतर मी बैठकीला गेलो. नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागलो. मला मंत्रीपदाची विचारणा करण्यात आली होती. परंतु एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असतील तर त्या मंत्रिमंडळात मला मंत्री किंवा राज्यमंत्री पदही नको, असं दौलत दरोडा यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.
ही बातमी पण वाचा : “आता ठाकरे बंधू एकत्र येणार?; मनसेच्या बैठकीत मनसैनिकांचा राज ठाकरेंसमोरच सूर”
दरम्यान, आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं दाैलत दरोडा यांनी यावेळी म्हटलं. तसेच शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसही मी उपस्थित राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकास झाला पाहिजे परंतु पक्षसुद्धा टिकला पाहिजे. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेला आदेश आम्हाला मान्य असेल, असंही दाैलत दरोड म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवारांना मोठा धक्का! अमोल कोल्हेंनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले…मी शरद पवारांसोबत
भाजपाच हिंदुत्व बेगडी; अजित पवार यांच्यासोबत असलेल्या या नेत्याचं मोठं वक्तव्य
अजित पवारांनी जो निर्णय घेतलाय तो…; अजित पवारांच्या बंडावर रोहित पवारांची प्रतिक्रिया