आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपले लक्ष महाराष्ट्रात केंद्रित केले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी पंढरपूरमध्ये के. चंद्रशेखर राव यांनी आपले संपूर्ण मंत्रिमंडळ आणून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
राज्यात राव यांच्या बीआरएस पक्षाच्या एकापाठोपाठ एक सभा होत आहेत. अशातच आता के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. पंकजा मुंडे यांनी यावर मौन बाळगल्याने अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. अखेर या चर्चेवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : समृद्धी महामार्गावरील अपघातावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले..’समृद्धी महामार्ग शापित आहे, कारण…
मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. स्वतःचं तिकीट मिळालं तर लढणं आणि प्रचार करणं हे माझं व्हिजन आहे. राज्याचे व्हिजन हे माझं दायित्व नाही. बीआरएसची ऑफर मी माध्यमातून पाहिली. पण, माझे विचार गुप्त आणि अंडरग्राउंड असतात, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इतके वर्ष मला भाषणाची सवय आहे. निसर्गत: जे सुचतं ते बोलते. एकच भाषण अनेक वेळा करत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगळं भाषण करते. पक्षाने विविध कार्यक्रम प्रत्येकाला सोपविले आहेत. बीड जिल्ह्यात आमच्या सहा जागा होत्या. आता तीन जागा आमच्याकडे आहेत. आम्ही केलेलं काम वाजवून सांगा असं कार्यकर्त्यांना सांगितले आहे. म्हणून दूध पोळले आहे आता ताक फुंकून प्यावे लागेल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
खोटं बोला पण रेटून बोला हे फडणवीसांचं धोरण; राष्ट्रवादीची टीका
“मोठी बातमी! शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्यांवर संकट?; थेट मंत्रीमंडळातून मिळणार डच्चू”
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…; पंकजा मुंडे यांचा एल्गार