Home महाराष्ट्र …अन् दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी ‘ती’ चूक मान्य केली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा...

…अन् दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी ‘ती’ चूक मान्य केली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर एक जाहिरात दिली होती. ज्यामध्ये “राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” अशा प्रकारचा संदेश लिहला होता. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, असा संदेशही एका सर्वेक्षणाच्या आधारे दिला होता.

ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली होती. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या जाहिरातबाजीमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जात आहे. यावर आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! सेनाभवनसमोरच आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात, वेगाने येणाऱ्या बाईकस्वाराने दिली धडक

ही जाहिरात छापून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि चूक मान्य केली. आमच्या काही लोकांनी चूक केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले, अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. ते रिपब्लिकन टीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ती जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत: माझ्याशी संवाद साधला. ती जाहिरात चुकीची छापली गेली, असं ते म्हणाले. आमच्या लोकांनी चूक केली केली, असंही त्यांनी मान्य केलं. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे आणि माझ्यात ज्याप्रकारचं घट्ट संबंध आहेत, ते कदाचितच युतीच्या सरकारमध्ये दिसतात., असं फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार?; जयंत पाटलांच्या ट्विटमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; म्हणाले मला स्वतःला…

…त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार महाराष्ट्रात नाहीत; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर घणाघात

मोठी बातमी! रोहिणी खडसेंना जळगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात, एकनाथ खडसेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…