आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने होत असते. अशातच काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“एच. डी. देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्ट्या’वर बोलत होते.
ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीसांना सत्ता पाडायची माहीती होती, मुख्यमंत्री कोण होणार, हे…; ठाकरेंच्या ‘या’ नेत्याचा गाैफ्यस्फोट
मला एका गोष्टीची खंत आहे. ही खंत शरद पवार यांनाही आहे. १९९६ साली देवगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसच्यावतीने सीताराम केसरी यांनी काढून घेतला. तेव्हा काँग्रेस अंतर्गत जे वातावरण होतं, त्यामुळे १०१ टक्के सर्व लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते. त्यावेळी शरद पवार ठाम राहिले असते, तर देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
दरम्यान, तेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडलो. लोकसभा निवडणुकीनंतर ११ महिन्यानंतर केसरी यांनी देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी काँग्रेसची परिस्थितीही चांगली नव्हती. १४५ खासदार होते. तर, शरद पवार संसदीय नेते होते. देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, निवडणूक लागण्याची शक्यता होती,” असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा सोबत प्रवास, चर्चांना उधाण”