आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : वर्षभरापूर्वी राज्यात मोठा राजकीय बाॅम्ब फुटला. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघालं.
या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी केली. यानंतर दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या गेल्या. अशातच आता ठाकरे गटातून, शिंदे गटात गेलेले आमदार संजय राठोड यांनी एक मोठं विधान केलं आहे.
संजय राठोड यांनी काल, बंजारा समाजाच्या एका मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात नेमकं काय घडलं? याबाबतचा खुलासा केला आहे.
ही बातमी पण वाचा : नाशकात एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; सहा नेते अन् शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
“मी ठरवलं होतं की आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहायचं. मी तिकडे (शिंदे गट) गेलो नाही. पण नंतर अचानक मला आपले धर्मगुरू महंत बाबूसिंह महाराज यांचा फोन आला. महंत जितेंद्र महाराज यांचाही फोन आला. आपल्या सगळ्या महंतांचे फोन आले. समाजातल्या अनेक नेत्यांचे फोन आले. त्यांनी मला सांगितलं की तू ज्यांच्याबरोबर आहेस, ते काही आता सत्तेत येणार नाहीत. पोहरादेवीचा विकास, समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर तुला त्यांच्याबरोबर (शिंदे गट) जावं लागेल. त्यानंतर मला महंत बाबूसिंह महाराज यांनी परवानगी दिली आणि मग मीदेखील गुवाहाटीला निघून गेलो, असा खुलासा संजय राठोड यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, पण…; एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपवर डागली तोफ
तुम्ही आणि उद्धव पुन्हा एकत्र येणार का?; राज ठाकरेंचं भावूक उत्तर, म्हणाले…