आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. आज सकाळी सर्व धर्मीयांच्या प्रथा परंपरांप्रमाणे पूजा करण्यात आली. सेंगोलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडीकडून कोरोनाकाळात 25 कोटींचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप
आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो. , असं राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं.
आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे.
ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं.
असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं…— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गटाचे ‘ते’ आमदार कधी अपात्र होणार?; विधासभा उपाध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले…
भाजपला घराचा आहेत; आपल्याच सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक