Home महाराष्ट्र आशिष शेलार यांनी मानले संजय राऊत यांचे आभार; म्हणाले…

आशिष शेलार यांनी मानले संजय राऊत यांचे आभार; म्हणाले…

मुंबई : कोरोनाच्या काळात शिक्षण क्षेत्राचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेलं आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या मुद्यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनातून भूमिका मांडली. यावर, भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं.

हीच ती वेळ! पदवी अंतिम वर्ष परीक्षा आणि एटीकेटी असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक आरोग्याची काळजी करणारी भूमिका आम्ही मांडली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनीही विद्यार्थ्यांची काळजी अग्रलेखात अधोरेखित केली. त्याबद्दल आभार, असं म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांचे आभार मानले आहे.

दरम्यान, कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासह देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात लाखो विद्यार्थी, संपूर्ण शिक्षण क्षेत्रही भरडले गेले आहे. एका पिढीचेच भवितव्य टांगणीला लागले आहे. राज्यातील १० लाखांवर विद्यार्थ्यांचीही काळजी करावीच लागेल, असं संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

करोना रूग्णांची आकडेवाडी कमी दाखवून फायदा नाही; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्रावर विठू माऊलींचे आशीर्वाद आणि मुंबा देवीची कृपा, म्हणून निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं

‘महाराष्ट्रा काळजी घे’ ; मनसेचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन