मुंबई : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या दोन माजी आमदारांनी राजीनामा दिला असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक या बंगल्यावर दोघांनीही राष्ट्रवादीत प्रवेश घेवून अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या दोन माजी आमदारांनी वंचित सोडण्याचं कारण पक्षांतर्गत असलेले मतभेद कारणीभूत असल्याचे म्हटलं जात आहे.
आज अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार श्री. बळीराम शिरस्कर आणि श्री. हरिदास भदे यांनी श्री. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.@PawarSpeaks @Jayant_R_Patil pic.twitter.com/5SbMWP8P2J
— NCP (@NCPspeaks) June 3, 2020
श्री.हरिदास भदे व श्री. बळीराम सिरस्कर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. श्री. हरिदास भदे हे 1992 व 2003 मध्ये अकोला जिल्हा परिषद सदस्य होते, तर 2004 व 2009 साली ते अकोल्यातून विधानसभेवर निवडून आले. श्री. भदे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव म्हणुन कार्यरत होते. pic.twitter.com/J17W5XoUjS
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) June 4, 2020
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्रावर विठू माऊलींचे आशीर्वाद आणि मुंबा देवीची कृपा, म्हणून निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं
‘महाराष्ट्रा काळजी घे’ ; मनसेचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
आम्ही तुमच्या पाठिशी आहोत; अरविंद केजरीवालांचं उद्धव ठाकरेंना टि्वट
अर्शद वारसीने केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक; म्हणाला…