आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हलचालींना वेग आला असून आज सिल्वर ओकवर महत्वाची बैठक पार पडली.
सिल्व्हर ओकमध्ये झालेल्या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आल्या आहे. याविषयी बोलताना आज झालेल्या चर्चेदरम्यान तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये खुल्या दिलाने आणि मनाने चर्चा झाली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
ही बातमी पण वाचा : कर्नाटक निवडणूकीवरून राज ठाकरेंचा, भाजपला टोला, म्हणाले…
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यामुळे आता महाविकास आघाडीला ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे आता जनतेला समजवण्यासाठी आम्ही जनतेत जाणार आहे. तर सर्वाच्च न्यायालयाच्या निकालाविषयी बोलताना हा निकाल उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागणार असल्याचे मतही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, राज्यातील जनतेला आम्ही आता विश्वास देणार असून आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रच लढणार असल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा..; अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
“मोठी बातमी! पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी दिला राजीनामा”
कर्नाटकात भाजपचं गणित कुठं चुकलं? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण, म्हणाले…