आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
दिल्ली : राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणबाबतची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून करण्यात दाखल आली होती. ही याचिका फेटाळण्यात आल्यामुळे आता मराठा आरक्षणचा मुद्दा पुन्हा अधांतरी राहिला आहे.
मराठा आरक्षणबाबतची पुनर्विचार याचिका विनोद पाटील यांनी दाखल केली होती. याचिका फेटाळल्यानंतर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“प्रश्न असा आहे की, मराठा समाजाने आतापर्यंत 4 मुख्यमंत्री पाहिले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आरक्षण मिळालं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे याचं सरकार पाहिलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचं सरकार पाहतोय. पण कुठल्याही सरकारने गांभीर्याने मराठा तरुणांना घेतलं नाही, हे अंतिम सत्य आहे”, असं विनोद पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं; राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, पडद्यामागे काय घडतंय?
मनसेला मोठा हादरा; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
“स्टाॅयनिस-आवेश खानची कमबॅक गोलंदाजी; लखनाैने, राजस्थानच्या हातातून विजय हिसकावून घेतला”
“जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेच; नाशिकमधील असंख्य महिलांनी हाती बांधलं शिवबंधन”