आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांचं सह्याद्री अतिथीगृहावर जाणं हे सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, गजानन काळे हे नेते सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे अवकाळी पावसाची झळ ज्या शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, या मागणीसाठी राज ठाकरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
मनसेला मोठा हादरा; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
“स्टाॅयनिस-आवेश खानची कमबॅक गोलंदाजी; लखनाैने, राजस्थानच्या हातातून विजय हिसकावून घेतला”
“जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेच; नाशिकमधील असंख्य महिलांनी हाती बांधलं शिवबंधन”
“…तर शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंकडे परततील”, काँग्रेस नेत्याचं सूचक वक्तव्य