आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनवाणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय राखीव ठेवला असून हा निर्णय केव्हाही जाहीर होऊ शकतो.
निर्णय कोणाच्या बाजूने लागू शकतो यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ही बातमी पण वाचा : मुंबईच्या विजयाची हॅट्रिक; निर्णायक सामन्यात मुंबईचा हैदराबादवर 14 धावांनी विजय
“शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे जाण्याची भीती भाजपाला वाटत असेल, असं मला वाटतं”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल गेला तर काय करायचं, असा प्रश्न आहे. आकडे पाहिले तर फडणवीस आणि उर्वरित शिंदे गटाकडे एकूण 149 आमदार असतील. उर्वरित शिंदे गटातील हे आमदार स्वगृही जातील का अशी भीती असू शकते. परंतु, 16 आमदार निलंबित झाले तर सभागृहाची सदस्यसंख्या 288 हून कमी होईल. त्यामुळे मध्यबिंदू 136 होईल. जवळपास 150 आमदार या गटाकडे असल्यास यांना धोका नाही. याचा अर्थ असा की खरंच गंभीर हालचाली सुरू असत्या तर उर्वरित शिंदे गटाचे आमदार पक्षांतर बंदी कायद्यात अडकायला नको म्हणून उद्धवजींच्या पक्षात सामील होतील, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अजित दादांचं रोखठोक स्पष्टीकरण
अजित पवार भाजपसोबत आले तर…; उदय सामंत यांचं मोठं विधान
चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, ड्यूप्लेसिस-मैक्सवेलची खेळी व्यर्थ, चेन्नईची RCB वर 8 धावांनी मात