आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व प्रकरणावर आता खुद्द अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
माझ्या विषयी ज्या काही बातम्या येत आहेत त्यात कुठलेही तथ्य नाही. तसेच माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी, राष्ट्रवादी पक्षासाठीच काम करणार, असं म्हणत अजित दादांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : अजित पवार भाजपसोबत आले तर…; उदय सामंत यांचं मोठं विधान
‘कारण नसताना माझ्याबद्दल माझ्या सहकार्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. वास्तविक ज्या ठिकाणी बातम्या येत आहे, त्यामध्ये काहीही तथ्य नाही’ , असं स्पष्टीकरण अजित पवारांनी यावेळी दिलं.
दरम्यान, आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, येथेच राहणार आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी वाढीसाठी काम करत राहणार. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार हे आता तुम्हा पत्रकारांना प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का? असा सवालही अजित पवारांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, ड्यूप्लेसिस-मैक्सवेलची खेळी व्यर्थ, चेन्नईची RCB वर 8 धावांनी मात
अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य; राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा
उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा हादरा; ‘या’ युवा नेत्याचा शिंदें गटात प्रवेश