Home क्रीडा “चिन्नास्वामीवर स्टाॅयनिस, पूरनचं वादळ; अटीतटीच्या सामन्यात लखनाैचा RCB वर शेवटच्या चेंडूवर विजय”

“चिन्नास्वामीवर स्टाॅयनिस, पूरनचं वादळ; अटीतटीच्या सामन्यात लखनाैचा RCB वर शेवटच्या चेंडूवर विजय”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बेंगलोर : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध लखनाै सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना लखनाैने शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर 1 विकेट राखत जिंकला.

या सामन्यात लखनाैने टाॅस जिंकून प्रथम गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 2 विकेट गमावत 212 धावा केल्या. बेंगलोरकडून विराट कोहलीने 44 चेंडूत 61 धावा केल्या. विराटच्या या खेळीत 4 चाैकार, 4 षटकारांचा समावेश होता. कर्णधार फाफ ड्यूफ्लेसिसने 46 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. फाफच्या या खेळीत  5 चाैकार, 5 षटकार ठोकले. तर ग्लेन मॅक्सेवेलने 29 चेंडूत 59 धावांची विस्फोटक खेळी केली. मॅक्सवेलने आपल्या खेळीत 3 चाैकार, 6 षटकार ठोकले. तर लखनाैकडून मार्क वूड, अमित मिश्राने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ही बातमी पण वाचा : ठाकरेंनंतर आता पवारांना मोठा धक्का, घड्याळाबाबत, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना लखनाैने हे लक्ष्य 20 व्या षटकात शेवटच्या ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत पूर्ण केलं. लखनाैकडून मार्कस स्टाॅयनिसने 30 चेंडूत 65 धावांची वेगवान खेळी केली. स्टाॅयनिसने आपल्या खेळीत 6 चाैकार, 5 षटकार ठोकले, निकोलस पूरनने 19 चेंडूत 62 धावांची विस्फोटक खेळी केली. पूरनने आपल्या खेळीत 4 चाैकार, 7 षटकारांची आतीषबाजी केली. तर आयुष बडोनीने 24 चेंडूत 4 चाैकारांसह 30 धावा केल्या. निकोलस पूरन फलंदाजी करत असताना, लखनाै आपल्या विजयापर्यंत लवकर पोहचेल , असं वाटत असतानाच पूरन बाद झाला, आणि बेंगलोरच्या गोलंदाजींनी, सामना शेवटच्या षटकांपर्यंत, शेवट्या चेंडूंपर्यंत नेला, मात्र शेवटी लखनाैने शेवटच्या चेंडूवर बाजी मारली, आणि लखनाैने सामना 1 विकेट राखून जिंकला.

महत्त्वाच्या घडामोडी 

“ठाण्यातील शिवसेनेच्या बालेकिल्यातील ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण”

ठाकरे गट-शिंदे गट एकत्र येणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणे पावरफूल नेते आहेत – चंद्रकांत पाटील