आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. त्यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे यांनी आपले शब्द जपून वापरावेत, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी दिला. तसेच उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, फडणवीस मोठ्या मनाचे असून ते त्यांना लगेच माफ करतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.
ही बातमी पण वाचा : फडणवीसांचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यांसह अडीचशे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
ठाकरे तुम्ही चूक केली, फडणवीस घराणे फक्त सुशिक्षितच नाही तर सुसंकृत देखील आहे. कुठलाही विचार न करता उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी. यासोबतच राज्यातील सध्याच्या खालच्या पातळीवरील राजकारणामुळे मन व्यथित झाल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी
“KKR च्या फिरकीसमोर RCB फेल, KKR चा RCB वर 82 धावांनी दणदणीत विजय”
“कोरोना पुन्हा फैलावतोय, सांगली कारागृहात कोरोनाची एंट्री, प्रशासन अलर्टवर”
काँग्रेसला अंतर्गत वादाचा फटका; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर