आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यानंतर ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
शिवसेना पक्ष तसेच सत्तांतराचा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून अंधेरी पोट निवडणुकीत ठाकरे यांना मिळालेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह वापरण्याची मुदत आज 27 मार्च रोजी संपणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला दिलेलं नाव आणि चिन्ह सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत वापरता येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा : सुषमा अंधारेवर टीका करताना, शिंदे गटातील ‘या’ आमदाराची जीभ घसरली,म्हणाले, तिनं काय काय लपडी…
मशाल हे चिन्ह वापरण्याची मुदत आज संपणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा नव्या चिन्हाच्या आव्हानाला सामोरं जावे लागेल का, अशी चर्चा सुरु होती. मात्र ठाकरे यांना या प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाल्याचं दिसतंय.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीआधीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा ठोकला. त्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव तात्पुरतं गोठवलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह देण्यात आलं होतं. तर एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या घडामोडी –
सुषमा अंधारेवर टीका करताना, शिंदे गटातील ‘या’ आमदाराची जीभ घसरली,म्हणाले, तिनं काय काय लपडी…
बारामतीसाठी भाजपचा गेम प्लॅन; तब्बल 52 शाखांचं उद्घाटन; थेट ‘पवार’ कुटुंबाला केलं चॅलेंज
52 नव्हे, 152 कुळं जरी खाली उतरवली तरी…; उद्धव ठाकरेंचा, बावनकुळेंना इशारा