आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र काही मिनिटांसाठी भेट झाली होती. मात्र या भेटीनंतर, यामागे काहीतरी राजकीय संकेत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कालची विधानभवनातील भेट हा योगायोग नव्हता. तर तो घडवून आणलेला योग होता, असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले. ते माध्यमांशी बोलत होते.
फडवणीस आणि ठाकरे यांच्या भेटीमागे उद्धव ठाकरे यांच्या मनातील भीती असल्याचं देशपांडे म्हणाले. दोन हिंदुत्त्ववादी पक्ष एकत्र येऊ नयेत, यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात. त्याच भीतीतून कालची भेट घेतल्याचं देशपांडे म्हणाले.
हे ही वाचा : मोठी बातमी! लोकसभा सचिवालयाची कारवाई, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
भाजप आणि मनसे एकत्र येऊ नयेत म्हणून 2014, 2017 मध्ये उद्धव ठाकरे यांनी चाली खेळल्या. हे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले. तीच भीती ठाकरेंना आहे., असंही देशपांडे म्हणाले.
दरम्यान, भाजप-मनसे युती होईल की नाही माहिती नाही. पण भीत्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणीप्रमाणे तुम्हाला हे सातत्याने सतावत आहे. म्हणून काल जो विधानसभेत घडला, तो योगायोग नव्हता. म्हणून तुम्ही विधानभवनाच्या दारात गप्पा मारत थांबलात. हे न कळण्याइतकं आम्ही मूर्ख नाहीत. गल्लीतल्या शेमड्या पोरालाही कळेल, असं म्हणत देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर आनंदच होईल”
ठाकरे-फडणवीस यांची ‘एकत्र’ विधानभवनात एन्ट्री; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी मोठी माहिती समोर, ठाकरे गटाला मिळाला मोठा दिलासा