आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. त्यामुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चा होत आहेत. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेकडून तसा प्रस्ताव आल्यास भाजपला कुणाचंही वावडं नाही, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केलं.
हे ही वाचा : “येणाऱ्या काळात सगळ्या महापालिकेंवर मनसेची सत्ता असणार म्हणजे असणारच”
राज ठाकरे भाजपला पाठिंबा देणार का ? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. कुणी पक्षात येण्यासाठी उत्सुक असेल, उद्या तुम्ही म्हटलं पक्षात येतो तर मी नाही म्हणणार नाही. आम्ही संन्यासी नाही. पक्ष संघटना आम्ही वाढवणारच. पक्ष संघटना शेवटच्या माणसापर्यंत आम्ही पोहचवणारच, असं बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंकडून अजून युतीचा प्रस्ताव आला नाही, पण तसा प्रस्ताव आला तर निश्चित चर्चा करू, असं बावनकुळे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
…म्हणून मनसेच्या नादाला लागायचं नाही; राज ठाकरेंचा भाजपच्या ‘या’ खासदाराला इशारा
आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
संदीप देशपांडेवर ज्याने हल्ला केला, त्याला…; वर्धापन दिनी राज ठाकरेंचा धमकीवजा इशारा