आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसेचा आज 17 वा वर्धापन दिन आहे. मनसेच्या वर्धापन दिनाचा सोहळा आज पहिल्यांदाच ठाण्यात आयोजित करण्यात आला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मनसेच्या भव्य अशा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर चाैफेर फटकेबाजी केली.
राज ठाकरे गेल्यावर्षी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी, नंतरच अयोध्येत यावं. नाहीतर त्यांना विरोध केला जाईल, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. मध्यंतरी बृजभूषण सिंह महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि इतर काही कार्यक्रमांनिमित्ताने महाराष्ट्रात येऊन गेले. या दरम्यान मनसे आणि बृजभूषण यांच्यातील वाद मिटला अशी चर्चा रंगली होती. मात्र आजच्या वर्धापन दिनात राज ठाकरेंनी बृजभूषण सिंह यांना टोला लगावला आहे.
हे ही वाचा : आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
“तुमचं हिंदुत्व म्हणजे नुसती जपमाळ असते का? प्रत्यक्ष कृतीतून तर कधी दिसत नाही. मला अयोध्येला बोलावलं, पण विरोध करणारे हिंदुत्त्ववादीच. आतलं राजकारण मला कळलं म्हणून मी गेलो नाही. मग ज्यांनी हे राजकारण केलं त्यांचं काय झालं पुढे? म्हणून आपल्या वाटेला जायचं नाही”, असा टोला राज ठाकरेंनी यावेळी बृजभूषण यांना लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
संदीप देशपांडेवर ज्याने हल्ला केला, त्याला…; वर्धापन दिनी राज ठाकरेंचा धमकीवजा इशारा