आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त पनवेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
“महाराष्ट्रातल्या राजकारणाचा चिखल झालाय. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. ज्या काही गोष्टी असतील, विरोध वगैरे या सगळ्या गोष्टी आमने-सामने असायच्या. मी विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी गेलो होतो. खाली सगळे बसले होते. मला कळतच नव्हतं की कोण कुठल्या पक्षात आहे”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “लावणी कलाकार गाैतमी पाटीलच्या चेजिंग रूममध्ये चोरून चित्रीकरण, राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल”
“म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतोय. महाराष्ट्रात जे काही चालू आहे, जे झालंय या विषयावर मी सविस्तर 22 तारखेला शिवतीर्थावर गुढी पाडव्याला बोलणार आहे. मी कोणतेही ट्रेलर, टीझर दाखवणार नाही. मी थेट 22 तारखेला सिनेमाच दाखवेन”, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
नामांतरास विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर मनसेचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले…
“पक्षाची चोरी झाली, चिन्हाची आणि नावाचीही चोरी झाली तरीही महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या मागे”