आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेसोबत बंडखोरी कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. मात्र हे बंड नेमकं कशामुळं झालं, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडी स्थापन होत होती, तेंव्हा पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांचा जीव गुदमरत होता. आपल्यासमोर पक्षाची वाताहात होताना त्यांना दिसत होती. उद्धवजी ऐकण्याच्या मानसिकतेत तेंव्हा नव्हते. एवढंच काय एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि तेंव्हा जेंव्हा बाहेर पडले तेंव्हा मला उद्धवजींनी संपर्क केला होता, असा खुलासा फडणवीसांनी यावेळी केला. ते झी 24 तास ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
हे ही वाचा : शरद पवारांना, देवेंद्र फडणवीसांची भिती वाटत होती, कारण…; भाजपच्या ‘या’ नेत्याचा मोठा गाैफ्यस्फोट
एकनाथ शिंदे सुरतमार्गे आमदारांना घेऊन निघाले तेंव्हा उद्धव ठाकरेंना संपर्क केला होता का? असा सवाल यावेळी फडणवीसांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देतानास फडणवीस म्हणाले की, असं आहे की, संपर्क तर झालाच होता. त्यानंतरही झाला होता. पण त्यावेळी मी उत्तर दिलं की आम्ही आता खूप पुढे निघून गेलो आहे. त्या क्षणी मला असंही सांगण्यात आलं की जाऊदेत आता झालं ते झालं तुम्ही मुख्यमंत्री व्हा. त्यावेळी मी खूप स्पष्टपणे सांगितलं की आता ती वेळ गेली आहे. मी धोका देणाऱ्यांपैकी नाही. जे लोक आमच्यासोबत आले आहेत त्यांना आम्ही तोंडघशी पाडू शकत नाही., असं फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि इतर आमदार बाहेर पडल्यावर आणि आमच्याशी संपर्क केल्यानंतर आम्ही त्यांना तोंडघशी पाडण्याचा काही प्रश्नच येत नाही हे उत्तर मी दिलं आणि तुमचं इतर काही असेल तर दिल्लीत बोला असंही मी त्यांना सांगितलं., असंही फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचा वंचित आघाडीला धक्का; वंचितच्या शहराध्यक्षांसह हजारो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पहाटेच्या शपथविधीवर आता खुद्द शरद पवारांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…
बाॅलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन, म्हणाले…