आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वंचित बहुजन आघा़डीला मात्र मोठा धक्का दिला आहे.
शरद पवार हे पुण्यातील रावेत येथे आले असताना त्यांच्या उपस्थितीत वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते असे अंदाजे शंभर जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसलाय.
हे ही वाचा : पहाटेच्या शपथविधीवर आता खुद्द शरद पवारांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…
तायडे व सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना फायदा होणार आहे, तर अपक्ष उमेदवार ठाकरे गटातील बंडखोर नेते राहूल कलाटे यांना धक्का बसला आहे.
काटे यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे चिंचवडमध्ये आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत तायडे व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
दरम्यान, भाजपला रोखण्यासाठी तसेच महाविकास आघाडीला मदत व्हावी म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे तायडे यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
बाॅलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन, म्हणाले…
उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश
पुणे मराठा महासंघा तर्फे भव्य शिवजयंती उत्साहात साजरी