आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत 2019 साली 72 तासांच सरकार स्थापन केलं होतं. यावेळी झालेल्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवारांसोबत झालेला शपथविधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांशी चर्चा करूनच झाला होता, असा गाैफ्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला होता. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : बाॅलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन, म्हणाले…
पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा केली होती, या देवेंद्र फडणवीसांच्या विधानाबद्दल विचारलं असता शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. इथं काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव पुढं येतं, मग लातूरमध्ये एखादा भूकंप झाला तर तिथेही याच व्यक्तीचं नाव येतं…” शरद पवारांचा बोलण्याचा रोख स्वत:कडेच होता. या टिप्पणीनंतर उपस्थित लोकांमध्ये, एकच हशा पिकला.
दरम्यान, पहाटेच्या शपथविधी झाला नसता, तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजनेवाले का इशारा काफी है, अशी मिश्कील टिप्पणी शरद पवारांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश
पुणे मराठा महासंघा तर्फे भव्य शिवजयंती उत्साहात साजरी
भावी मुख्यमंत्री होणार का?; NCP कार्यालयाबाहेरच्या पोस्टरवर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…