आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णय निवडणूक आयोगाने दिला यानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त करा अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला भाजपच्या मोठ्या नेत्याने पाठिंबा दिला आहे.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा देत उध्दव ठाकरेंच्या मागणीचे समर्थन केेले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे
निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण आयोगाचे कामकाज संशयास्पद आहे, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.
हे ही वाचा : …त्यामुळे माझाही, विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या दाव्याने खळबळ
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे चोरांच्या हाती दिले आहे. निवडणूक आयोग विकले गेले आहे. शिवसेना पक्षाविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त केला पाहिजे. प्रत्यक्ष निवडणुका घेऊनच आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली होती.
I support Uddhav Thakre demand to sack the CEC since his tenure earlier in Finance Ministry was dubious
— Subramanian Swamy (@Swamy39) February 21, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गटाचा ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला
आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी; पुण्यात शिवसैनिकांची पोस्टरबाजी