आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेचा खटला प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालामुळे मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून जारी केलेला व्हीप, ठाकरे गटातील आमदार पाळणार का? किंवा ठाकरे गटातील आमदारांनी शिंदे गटाचा व्हीप पाळला नाही, तर त्यांच्यावर कारवाई होईल का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. यावर आता ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : निवडणूक आयोगाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणले…
हा कायद्याचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे युक्तिवाद करण्यात येतील. त्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल? हे सांगणं आज कठीण आहे. पण माझ्या मते या प्रकरणात कायद्याचे अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत, केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे, त्याला न्यायालय स्थगिती देईल का? हे बघितलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया उज्वल निकम यांनी यावेळी दिली. ते टि.व्ही .9 मराठीशी बोलत होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
“…हेच भाजपच पराभवाचं लक्षण आहे”; राष्ट्रवादीची टीका
‘शिवसेने’च्या निकालावर आता उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…