आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : आपल्या डोक्यात नेतृत्वाची हवा गेली तर आपली काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना दिला आहे. नाशिक येथे दोन दिवस चाललेल्या राज्य कार्यकारणी बैठकीच्या समारोपीय भाषणात ते बोलत होते.
भाजपला 2014 नंतर निवडणुका जिंकायची सवय लागली आहे. पत्रकारांनाही आपण जिंकल्याच्या बातम्या देण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आपण एक जरी निवडणूक हरलो तरी आत्मचिंतणाची गरज आहे. मात्र आपल्या डोक्यात नेतृत्वाची हवा गेली तर आपली काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही, हे लक्षात असू द्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “मोठी बातमी! राज ठाकरे- भाजपची युती होण्याची दाट शक्यता”
हिदुत्व व प्रखर राष्ट्रवाद हे भाजपचे ब्रीद वाक्य आहे. ते घेऊनच यापुढे आपल्याला मार्गक्रमण करायचे आहे. त्यासाठी पुढील दिड ते दोन वर्षे आपल्याला पक्षाच्या विस्तारासाठी दिवसरात्र परिश्रम करावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाने आपला वेळ द्यावा. त्यातून भाजप निश्चितच राज्यात आपले सरकार स्थापन करेल, यात मला शंका वाटत नाही, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं घेतली देवेंद्र फडणवीसांची गुप्त बैठक, चर्चांना उधाण”
16 आमदार अपात्र ठरले तरी…; अजित पवारांचं मोठं विधान
“उद्धवभाऊ, मुख्यमंत्री असताना राज ठाकरे मैदानात उतरले, आता काय झालं?”