आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
माजी राज्यमंत्री विजयबाप्पू शिवतारे यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा इंदापूर तालुका, करमाळा सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटातील असंख्य पदाधिाऱ्यांनी शिंदे च गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.
हे ही वाचा : स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका; पदवीधर निवडणुकीवरून ठाकरे गटाचा निशाणा
अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेला हा मतदार संघ असल्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
महत्त्वाच्या घडामोडी –
पठाण चित्रपटासोबतच, मराठी चित्रपटांचेही शो लोवा, नाहीतर…; मनसेचा धमकीवजा इशारा
आंबेडकरांना महाविकास आघाडीचा भाग व्हायचा असेल तर…; संजय राऊतांचा, प्रकाश आंबेडकरांना सल्ला
औरंगाबादमध्ये शिंदे गट-ठाकरे गटाचे नेते एकाच मंचावर एकत्र?; राजकीय चर्चांना उधाण