आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : कालपासून नाॅट रिचेबल असणाऱ्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील या नुुकत्याच विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळाला आहे. शुभांगी पाटील यांनी नुकतीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर शुभांगी पाटील या नाॅट रिचेबल झाल्या होत्या. त्यानंतर आज त्या समोर आल्या आहेत.
शुभांगी पाटील या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर शुभांगी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हे ही वाचा : “नाशिकमध्ये मनसेला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करणार”
मला ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळालेला आहे. आता महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी पहिली प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी यावेळी दिली. मी उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. आता महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार आणि जयंत पाटील हे चारही पक्षश्रेष्ठी तुम्हाला याबाबत माहिती देतील. मी न सांगितलेलं बरं, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी यावेळी दिली.
दरम्यान, शुभांगी पाटील यांना यावेळी, उमेदवारी मागे घेण्यासाठी कुणाकडून दबाव टाकण्यात आला का, तसेच कुणी धमकी दिली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर देत, हो असंच उत्तर दिलं. नॉट रिचेबलवरुन तुम्ही समजू शकता. मी न बोललेलं बरं. पण मी माघार घेतली नाही, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
नारायण राणेंवर टीका करताना, खासदार संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले…
अजित पवारांचा पुण्यात अपघात; म्हणाले, थोडक्यात वाचलो अन्यथा…
“सत्यजित तांबेंच्या अडचणी वाढणार; ठाकरेंकडून ‘या’ मोठ्या नेत्याला पाठिंबा”