आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची ब्रीच कँडी रूग्णालयात जाऊन भेट घेतली. धनंजय मुंडे यांचा 4 दिवसांपूर्वी परळीत अपघात झाला होता. या अपघातानंतर मुंडे यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
धनंजय मुंडे यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धनंजय मुंडे यांना आणखी काही दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी राहावं लागणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
हे ही वाचा : “अपघातांच्या मालिका सूरूच; आमदार बच्चू कडूंचा अपघात, उपचारासाठी रूग्णालयात दाखल”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्या. या भेटीदरम्यान, पंकजा यांनी धनंजय यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच अपघात कसा घडला, याविषयीही पंकजांनी विचारपूस केली.
दरम्यान, दोन्ही भाऊ-बहिणीमध्ये राजकीय वैर आहे. मात्र जेंव्हा प्रकृती संबंधित कुणाला काही अडचण आली, मुंडे कुटुंबावर संकट आलं तर हे दोन्ही भाऊ-बहीण एकत्र येतात, हे याआधीदेखील राज्याने पाहिलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार, ‘या’ महिला नेत्यानं केला बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश”
“मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस-शरद पवारांनी केला एकाच गाडीतून एकत्र प्रवास, राजकीय चर्चांना उधाण”