मुंबई : परप्रांतीय मजूर सध्या कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे आपापल्या राज्यात गेले आहेत. अशावेळी इथे अनेक क्षेत्रांमध्ये कामगारांची उणीव भासते आहे. मात्र परप्रांतीयांची जागा घ्यायला मराठी युवकांकडे तेवढं कौशल्य नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रातील युवकांकडे आवश्यक ती सर्व कौशल्य आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इथल्या युवकांना कमी लेखू नये, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जे मजूर गेले ते परत येतील, त्यांचे स्वागत आहे. पण मोदींनी राबवलेला ‘स्कील इंडिया’ महाराष्ट्रात फेल गेले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, आणि याचं उत्तर फडणवीसांनी दिलं तर बरं होईल, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस
“त्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…”
सोनू सुद जर यूपीमध्ये असता तर योगी सरकारने…; यूपी काँग्रेसचा योगी सरकारवर निशाणा
भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?; जयंत पाटलांचा सवाल